Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • kavyageeta
  • काव्यगीता अध्याय २ : सांख्ययोगांतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणे (Sthitapradnya Lakshane)

काव्यगीता अध्याय २ : सांख्ययोगांतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणे (Sthitapradnya Lakshane)

by Rajendra Vaishampayan / Monday, 19 April 1999 / Published in kavyageeta
अध्याय २ : सांख्ययोगांतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणे 
 
अर्जुन वदला सांग केशवा स्थितप्रज्ञ या कसा दिसे ।
कसे बोलतो कसे चालतो लक्षण त्याचे काय असे ।
प्रश्न ऐकुनी उत्तर देता वासुदेव तो मनी हसे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे ।।१।।
 
निश्चयात्मिका बुद्धी ज्याची दृढ हे ज्याचे ध्येय असे ।
बुद्धीला नच पडती शाखा मोही न तो कधी फसे ।
बोले ना जो अज्ञपणाने संयम ज्याचा धर्म असे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।२।।
 
विषयभोग जो दूर ठेवितो ऐश्वर्याची आस नसे ।
भक्तिपूर्ण हि सेवावृत्ती अंतर ज्याचे शुद्ध असे ।
योगक्षेम रक्षा प्राप्ती अन त्रिगुणांच्या जो पार असे  ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।३।।
 
मनोवासना टाकुनि देतो चिन्मयगोडी ज्यास असे ।
क्षुब्ध कधी ना होतो दु:खी सुखास तो आसक्त नसे ।
भय क्रोध आसक्ती त्यजुनि स्थिरबुद्धी हा मुनी असे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।४।।
 
ना हर्षे हा शुभघटिकेने दुर्घटनी ना कष्टि दिसे ।
हानीची त्या नसते चिंता लाभाचीही तमा नसे ।
संतूलित ते चित्त ठेउनी नित्यानिरंतर सदा असे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।५।।
 
 
कासव कवचामध्ये घेई ओढुनि सारे अंग जसे ।
विषयामधुनी काढुनि घेई स्थितप्रज्ञ सर्वांग तसे ।
विषयासक्ती सरुनी ज्याच्या आत्मप्रचीती मनी वसे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।६।।
 
जसा भोवरा स्वाहाकारी वस्तू जी जी त्यात फसे ।
सर्व इंद्रिया अधीन होती सद्बुद्धी  अपवाद नसे ।
परी वीर जो असे निग्रही प्रभुचरणी जो लीन असे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।७।।
 
आसक्ती विषयाच्या उदरामधे जन्म हि घेत असे ।
आसक्तीच्या उदरी वाढे कटूवासना बीज असे ।
जाणे जो क्रोधाच्या जन्मा हीच वासना मूळ असे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।८।।
 
क्रोधाने संमोहन होई संमोही स्मृतिभ्रंश असे ।
स्मृतिभ्रंशाने बुद्धिनाश हा मानवप्राण्या अटळ  असे ।
दूर ठेवितो बुद्धिनाश जो विषयांपायी पतित नसे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।९।।
 
रागद्वेष जो दूर ठेउनी इंद्रिय निग्रह करीतसे ।
स्वातंत्र्याची चौकट जाणुनि मर्यादेला रखतसे ।
होतो तो सत्पात्र कृपेचा सुधीर जीवनमुक्त असे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।१०।।
 
स्वैराचाऱ्या नसते बुद्धी भावनीकता कधी नसे ।
भाव अभावी नसते शांती नसता शांती सूख नसे ।
सोडी ना जो नाव तुफानी नाविक जो अतिदक्ष असे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।११।।
 
सागरास या मिळती सरिता उदधि तरिही शांत असे ।
इच्छांच्या धारांना पाही अंतरात विश्रांत असे ।
ढळते नच ती शांती जयाची चित्ती जो निवांत असे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।१२।।
 
स्थिरचर सृष्टी निजली असता जया अंतरी जाग असे ।
सृष्टीच्या कर्माच्या वेळी रात्र तयाची होत असे ।
विश्वाची जो वाही चिंता अंतर्दर्शी मुनी असे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।१३।।
 
सांगे अंती ऐक अर्जुना विषयत्याग जो करीतसे ।
तटस्थतेने पाही विषयाआहारी जो जात नसे ।
मोह अहंता टाकी ज्याला स्वामित्वाची आस नसे ।
धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे।।१४।।
 
राजेंद्र (?) १९ एप्रिल १९९९
  • Tweet
Tagged under: Adhaay 2, Bhagwad Geeta, Bhagwadgeeta, Kavya Geeta, काव्यगीता, भगवद्गीता

About Rajendra Vaishampayan

What you can read next

काव्यगीता अध्याय ४ : ज्ञानकर्मसंन्यास योग (Dnyan Karm Sanyaas Yog)
काव्यगीता अध्याय १७ – श्रद्धात्रय विभाग योग  (ShraddhaTraya Vibhag Yog)
काव्यगीता अध्याय २ : सांख्य योग (Sakhkya Yog)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP