Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • kavyageeta
  • काव्यगीता अध्याय १० – विभूती योग  (Vibhuti Yog)

काव्यगीता अध्याय १० – विभूती योग  (Vibhuti Yog)

by Rajendra Vaishampayan / Thursday, 30 December 1999 / Published in kavyageeta

अध्याय १० : विभूती योग 

 

परमब्रह्म श्रेष्ठ तू  परमधाम दिव्य तू ।

देवता शिरोमणी शाश्वतसे तत्व तू ।।१।।

 

असो असित देवलांचे देवऋषी नारदांचे ।

वा तुझे असो स्वयेच  कौतुकाचे बोल तू ।।२।।

 

चिन्मय हे तत्व तू परमशुद्ध सत्व तू ।

भूतांचा देव देव दानवा अगम्य तू ।।३।।

 

पार्थ म्हणे सांग तू चराचरात व्यक्त तू ।

विभुती या सांग कसा चिंतनास योग्य तू ।।४।।

 

कृष्ण म्हणे दिव्य मी अनादि मी अनंत मी ।

विस्तृत ऐश्वर्या मीच ठायी ठायी व्यक्त मी ।।५।।

 

तेजस्वी सूर्य मी आदितीचा विष्णू मी ।

देवतात इंद्र मीच नक्षत्री चंद्र मी ।।६।।

 

वेद सामवेद मी इंद्रियात चित्त मी ।

सर्व जीवितांमधील चेतानास्वरूप मी ।।७।।

 

रुद्रमणी शंभू मी धनाढ्य तो कुबेर मी ।

वसुंमधील अग्नी मी गीरीवरात मेरु मी ।।८।।

 

सेनानी स्कंध मी जलांमधे समुद्र मी ।

भक्तश्रेष्ठ ब्रह्मा मी पुरोहित श्रेष्ठ मी ।।९।।

 

नादे ॐकार मी भृगु मुनिश्रेष्ठ मी ।

सर्वोत्तम यज्ञ असे देवांचे नाव मी ।।१०।।

 

वृक्षे अश्वत्थ मी सिद्धातील कपिल मी ।

देवर्षी सर्वश्रेष्ठ नारदीय रूम मी ।।११।।

 

उच्चैश्रव अश्वातिल ऐरावत हत्तीतिल ।

गांधर्वी चित्ररथस मनुजे भूपाल मी ।।१२।।

 

शस्त्रांतिल वज्र मी कामधेनु गाय मी ।

कामदेव मदन मीच वासुकी सर्पात मी ।।१३।।

 

नागातिल शेष मी जालाधीश वरुण मी ।

पितारांतिल अर्यमा मृत्यू नियमित मी ।।१४।।

 

दैत्ये प्रह्लाद मी नियंत्रीत काल मी ।

पशूंमध्ये सिंह मीच पक्षिराज गरुड मी ।।१५।।

 

वायू शुद्धात मी शस्त्रधारी राम मी ।

मगर जलचरात मीच गंगा सरितांत मी ।।१६।।

 

सृष्टीचा आदि मीच सृष्टीचा अंत मीच ।

सृष्टीचा मध्य मीच विद्या अध्यात्म मी ।।१७।।

 

विवादांत तत्व मीच समासात द्वंद्व मीच ।

अविनाशी काल मीच  अक्षरी अकार मी ।।१८।।

 

सर्वलायी मृत्यू मी  विश्वमुखी ब्रह्म मी ।

उत्पत्ती कारणास पदार्थांत बीज मी ।।१९।।

 

श्रौत स्मार्त यज्ञ मी नारीतिल कीर्ती मी ।

मेधा श्री वागस्मृती धृती क्षमा स्त्रियांत मी ।।२०।।

 

बृहत्साम मंत्रातिल गायत्री छंदातिल ।

मार्गशीर्ष मासातिल ऋतूतला वसंत मी ।।२१।।

 

कपटातिल द्यूत मी तेजस्वी तेज मी ।

साहस बल विजय आणि पुरुषांतिल सत्व मी ।। २२।।

 

वृष्णीतील कृष्ण मी पांडवात पार्थ मी ।

मुनिंमध्ये व्यास आणि कविवरात शुक्र मी ।।२३।।

 

शासकीय दंड मी गोपनीय मौन मी ।

विजयातिल नीती अन ज्ञानियास ज्ञान मी ।।२४।।

 

औषध झाडांत मी समिधा यज्ञात मी ।

यज्ञातिल अग्नी मी  अग्नीतिल तेज मी ।।२५।।

 

वस्तूतिल शक्ती मी वस्तूतिल कांती मी ।

जे जे तेजस्वी असे त्यांच्यातिल अंश मी ।।२६।।

 

अधिक काय सांगू मी जीवन आधार मी ।

जे दिसे असे तयात मीच मी मीच मी ।।२७।।

 

राजेंद्र (?) ३० डिसेंबर १९९९

  • Tweet

About Rajendra Vaishampayan

What you can read next

काव्यगीता अध्याय ९ – राजविद्या राजगुह्य योग (Rajavidya Rajaguhya Yog) 
काव्यगीता अध्याय ५ : कर्म संन्यास योग (Karma Sanyaas Yog)
काव्यगीता अध्याय ७ : ज्ञान विज्ञान योग (Dnyan Vidnyan Yog)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP