अलक ४९.१ काही क्षुल्लक कारणावरून तिचा उच्चविद्याविभूषित मुलगा तिच्यावर चरफडून, तिला वाटेल ते बोलून तिनेच तयार केलेला जेवणाचा डब्बा घेऊन बाहेर पडला.वाईट वाटून ती भरल्या डोळ्यांनी तिच्या दुसऱ्या मुलाजवळ येऊन बसली.त्याने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले, कपाळावरचा घाम पुसला आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि एवढंच स्वतःशी पुटपुटली,”याला लोक मतिमंद का म्हणतात?”

Tagged under:

३५.१ तो समुद्रावर गेला आणि एक एक शिंपला हातात घेऊन आत पाहत होता. कुणीतरी त्याला विचारलं काय करतोयस ? तो म्हणाला ,” माझी आजी काल गोष्ट सांगताना म्हणाली की आपली नाती म्हणजे शिंपल्यातल्या मोत्यांसारखी असतात, दुर्मिळ आणि मौल्यवान. म्हणून माझे आई बाबा मिळतायत का ते शोधतोय या शिंपल्यात..” ३५.२ दिवे गेले म्हणून तो अंधारात चाचपडत

Tagged under: ,

३४.१ त्याच्या अप्रतिम पदलालित्याचं तोंड भरुन कौतुक केल्यावर त्याला रंगमंचावर बोलावलं तेव्हा सत्काराला उत्तर देताना तो म्हणाला”क्षमा करा, तुमच्यासमोर असं व्हीलचेअरवर बसून राहणं योग्य नाही पण नृत्य करताना होणाऱ्या वेदना येऊ देत नाही मी चेहऱ्यावर पण नृत्यानंतर मात्र माझ्या वेशभूषेबरोबर माझे जयपूर फूट पण काढावे लागतात मला … ३४.२ परवडत नाही म्हणून दोघांपैकी एकालाच खूप

Tagged under: ,