हॅप्पी डेथ ऍनिव्हर्सरी – २३ जुलै २०१८
मी सकाळी उठलो आणि माझं व्हाट्सअप उघडलं. नेहेमीचे ‘गुड मॉर्निंग’ चे संदेश, सकाळ प्रसन्न करू पाहणारे आणि आपण अगदीच ‘गये गुजरे’ आहोत अस उगाच अध्यारुत धरून पाठवलेले ज्ञानगुटी मिश्रित संदेश, फुलाचे इंटरनेटवर फुकट उपलब्ध असणारे म्हणून ‘दिल खोलके’ पाठवलेले फुलांचे फोटो, देवाचे फोटो व अग्रेशित भक्तीसंदेश इत्यादी बरीच नित्याची प्रभातसफाई झाली.आणि माझं लक्ष गेलं एका
- Published in marathi
मनाची रद्दी – १८ मार्च २०१८
प्रसन्न सकाळी चहाचा वाफाळता कप हाती घेऊन कोरं करकरीत वर्तमानपत्र पुढ्यात घेऊन बातम्या वाचण्यामध्ये एक वेगळाच अवर्णनीय रोमान्स असतो. पतीराज या रोमान्सच्या मूडमध्ये असताना गृहिणींच्या मनात मात्र नवऱ्याने सकाळचा पेपर हातात घेतल्या क्षणी सवतीमत्सर का जागा होतो हे मला अजून न उमगलेलं कोडं आहे. चिडचिडीचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला तर, ” मी रिकामटेकडी बसली नाहीये
- Published in marathi
यशाच्या नशेचे विड्रॉवल सिम्टम्स – ३ मार्च २०१८
मी काही दिवसांपूर्वी एका कलाकाराची जीवनी वाचत होतो. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला स्वप्नवत वाटावं असं त्या कलाकाराला यश मिळालेलं होतं. अत्यंत देखणं रूप, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता सर्वच. एका काळी तो कलाकार इतका यशस्वी होता की प्रत्येक उदयोन्मुख कलाकाराचं त्या कलाकारासारखं यशस्वी व्हायचं हेच ध्येय असायचं. पण पुढे त्या कलाकाराला व्यसन लागलं आणि हळू हळू तो त्याच्या
- Published in marathi
नोटांची पॅथॉलॉजि – ८ फेब्रुवारी २०१८
मागच्या आठ्वड्यातलीच गोष्ट. मला काही कारणासाठी १००० रुपयांचे १० रुपयांच्या नोटांमध्ये सुट्टे हवे होते. शनिवार संध्याकाळची वेळ त्यामुळे बँका बंद होत्या. मग आमच्या जवळच्याच बाजारात ‘दे दान सुट्टे गिऱ्हाण’ करत दुकानं पालथी घालत होतो. अपेक्षेप्रमाणे सगळ्यांनीच सुट्टे देण्यासाठी नकारघंटा वाजवली. अखेरचा प्रयत्न म्हणून एका डेरीवाल्याकडे सुट्टयांची मागणी केली आणि काय विचारता, तो डेरीमालक सुट्टे द्यायला
- Published in marathi