माझ्या माहिती तंत्रज्ञानाच्या कारकिर्दीत म्हणा किंवा सांगीतिक प्रवासात म्हणा, मला खूप चांगल्या मंडळींबरोबर काम करण्याचा योग आला. त्यात खूप दिग्गज माणसं होती आणि त्यांनी सहज बोलता बोलता मला इतक्या गोष्टी शिकवल्या की त्या सहज अंगी मुरत गेल्या आणि त्याचा एकंदरीत माझ्या वैयक्तिक जीवनावर आणि व्यावसायिक कारकिर्दीवर मूलगामी परिणाम झाला. एकदा माझा एक बॉस मला सहज

आज माझा मुलगा त्याच्या एका मित्राच्या ‘बद्देपार्टी’ हुन परत आला आणि त्या पार्टीचं  रसभरीत वर्णन करू लागला. एका अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये साधारण 100 लोकांची पार्टी होती. त्या पार्टीतला मेनू त्याने सांगितला तेव्हा, तुडुंब पोट भरलेलं असूनसुद्धा पुन्हा एकदा त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, आणि मी हेही प्रामाणिकपणे मान्य करतो की तो मेनू ऐकून या वयातही माझे

साधारण काही काळ लोटला की काही घरातील फ्रिजची धोक्याची पातळी उलटते. म्हणजे ‘आता मज सोसवेना भार’ या स्थितीकडे तो फ्रिज जायला सुरवात झालेली असते. एकावर एक भांडी, वाट्या, वाडगे, इत्यादींच्या एकमेकांच्या साहाय्याने शक्य असलेल्या सगळ्या तोल सांभाळण्याऱ्या रचनांचे नमुने तिथे उपस्थित असतात. जरा धक्का लागला तर ती सर्व सर्कस केव्हा खाली कोसळेल याचा नेम नसतो.

काही दिवसांपूर्वी एका पिकनिकला जाण्याचा योग आला. आम्ही सर्व तयारी करून निघालो आणि कारचे  कागदपत्र तपासून पाहताना लक्षात आलं की गाडीच्या PUC (Polution Under Control) सर्टिफिकेटची संपण्याची तारीख तीन चार दिवसात येणार होती. म्हणून एका पेट्रोल पंपाच्या जवळ एक PUC सेंटरवर गाडी नेऊन उभी केली. तिथला कर्मचारी चांगला मुरलेला होता. त्याने विचारलं ‘चेक करू की

TOP