हौदाचं समीकरण- ३० ऑक्टोबर २०१७
सहावी किंवा सातवीची इयत्ता असेल. गणिताच्या पुस्तकातील काळ, काम, वेग यांचं त्रैराशिक शिकवत असताना बरीच उदाहरणं घेऊन आम्हाला शिक्षकांनी ह्या संकल्पना शिकवल्या. त्यात एक गणित हमखास असायचं. एक हौद आहे. त्याची उंची, लांबी, रुंदी अमुक अमुक आहे. त्या हौदात काही नळ अमुक अमुक एवढं पाणी दर मिनिटाला वरच्या बाजूने हौदात सोडतात. त्या हौदाच्या तळाला काही
- Published in marathi
गाणारा माणूस गंमतीला- २८ ऑक्टोबर २०१७
काही काळापूर्वी घडलेला एक प्रसंग. त्या प्रसंगात दोन पात्र होती. एक पात्र होतं ते म्हणजे एक २०-२२ वर्षाचा तरुण, तात्पुरतं त्याचं नाव ठेऊ ‘शशी’. आणि दुसरं पात्र होतं ते म्हणजे ५२-५५ वर्षाचे त्याचे बाबा, त्यांचंही तात्पुरतं नाव ठेऊ ‘सुरेशराव’. शशीचं इंजिनीअरिंगचं शेवटचं वर्ष. घरात संगीताचं वातावरण. शशीने शास्त्रीय संगीताचं खूप व्यवस्थित शिक्षण घेतलेलं, शिक्षण सांभाळून
- Published in marathi
डिजिटल सुबत्ता – २५ ऑक्टोबर २०१७
मागच्या आठवड्यात मी माझा लॅपटॉप आतून स्वच्छ करण्याचा घाट घातला. आतून स्वच्छ करणे याचा अर्थ असा की नवीन फाईल साठवण्यासाठी जागा करणे. लॅपटॉप घेतल्यापासून मी त्याच्या हार्ड डिस्क मध्ये केवळ फाइल्स साठवतच गेलो. माझ्या लॅपटॉपची साठवणुकीची क्षमता जेव्हा मी घेतला त्यावेळी ५०० घबाड इतकी होती (१ घबाड = १ GB असं या एककाला मला सुचलेलं
- Published in marathi
माझ्यातला अंशावतार – २४ ऑक्टोबर २०१७
माझ्यातला अंशावतार काही दिवसापूर्वी एक सोहळा पाहिला. या सोहळ्यात उत्सवमूर्ती म्हणून भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेली ८ ते १५ वयाच्या आसपासची २५ मुलं होती. त्यांना भारताच्या माननीय राष्ट्रपतींकडून सम्मानित केलं जाणार होतं. त्या मुलांकडे पाहिलं तर भारतातल्या इतर कोट्यवधी मुलांसारखीच दिसणारी ही मुलं होती. पण त्यांचा माननीय राष्ट्रपतींच्या तर्फे सन्मान होणार होता कारण त्यांनी असं काही
- Published in marathi



