४१.१   मंदिराच्या आत मी मूर्तीसमोर उभा होतो आणि मंदिराबाहेर दाराजवळ तो भिकारी. काय  फरक होता आमच्यात? नाही सांगू शकलो मी… ४१.२ मंदिरात सेल्फी घेणाऱ्या एकाला एका लहान मुलाने देवाचा फोटो विकत घ्यायची विनंती केली. “देवाच्या फोटोत देव नसतो” असं त्या मुलाला सांगून त्या सेल्फीवाल्याने फटकारलं. मी माणसातला विरोधाभास पाहून नुसता स्वतःशीच हसलो. ४१.३ माणसाची ज्याच्याशी

४०.१ सफाई कामगाराने कंटाळून शेवटी तळ मजल्यावर बिल्डिंगच्या लिफ्टच्या बाहेर असलेली ‘इथे थुंकू नका’ ही पानाच्या पिंकांनी रंगलेली पाटी काढली आणि त्या जागी  देवाचं छानसं चित्र असलेली टाईल लावली. आता लोक टाईलचा तेवढा भाग सोडून आजूबाजूला थुंकतात…  ४०.२ देशाची सराहद्द राखणारा एक जवान सुट्टीवर घरी आला. आल्यावर कळलं की त्याच्या सख्ख्या भावाने शेतीत वाटा मागितला

३९.१ एकुलता एक म्हणून त्यांच्या मुलाला त्यांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही. पण त्यामुळे आपण कुठे कमी पडलो तर काय करायचं, ही गोष्ट तो मुलगा कधीच शिकू शकला नाही. ३९.२ गर्भश्रीमंत घरातल्या मुलांच्या अर्ध्या होऊन टाकून दिलेल्या पेन्सिली कचरा साफ करणारी मोलकरीण आपल्या मुलांसाठी घरी घेऊन जायची. त्या अशिक्षित मोलकरणीला माहीत होतं हीच अर्धी

३८. १ तो रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल वर थांबला होता . त्याच्या लक्षात आलं एका कुत्र्याच्या छोट्या पिल्लाला रस्ता ओलांडता येत नाहीये. त्यांनी त्या पिल्लाला उचललं आणि दोघांनी रस्ता ओलांडला. त्याने त्या पिल्लाला सोडून दिलं आणि आपली आंधळ्यांची काठी उलगडून तो मार्गस्थ झाला. या व्यग्र शहरात कुणी कुणाचा नसतो हे सत्य त्या कुत्र्याच्या पिल्लाला अजून उमगलं

३७.१ त्याचं वय झालं होतं. ज्यांनी मानसन्मान दिले त्यांना तो विसरला पण ज्यांनी अपमान केले त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजारसुद्धा विस्मृतीत ढकलू शकला नाही.. ३७.२ स्वातंत्र्यसैनिक म्हणून अनेक वेळा कारागृहाच्या फेऱ्या त्याने पचवल्या. पण राहत्या घरात म्हातारपण नावाचं कारागृह मात्र त्याला असह्य झालं होतं… ३७.३ खूपशा आवडी निवडी त्याने म्हातारपणी करू म्हणून राखून ठेवल्या. त्याच्या लक्षात आलं

कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे.  ३६.१ ‘क्ष’ व्यक्तीच्या आशीर्वादाने, ‘य’ व्यक्तीच्या आदेशानुसार, ‘ज्ञ’ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली, ‘फ’ व्यक्तीच्या प्रेरणेने, ‘स’ व्यक्तीच्या सल्ल्यानुसार, ‘छ’ व्यक्तीच्या सहकार्याने, ‘ढ’ व्यक्तीची आमच्या बिल्डिंगच्या क्रिकेट टीममध्ये बारावा खेळाडू म्हणून निवड झाली म्हणून त्याच्या शुभेच्छूक मित्रपरिवाराने सर्व टीम

३५.१ तो समुद्रावर गेला आणि एक एक शिंपला हातात घेऊन आत पाहत होता. कुणीतरी त्याला विचारलं काय करतोयस ? तो म्हणाला ,” माझी आजी काल गोष्ट सांगताना म्हणाली की आपली नाती म्हणजे शिंपल्यातल्या मोत्यांसारखी असतात, दुर्मिळ आणि मौल्यवान. म्हणून माझे आई बाबा मिळतायत का ते शोधतोय या शिंपल्यात..” ३५.२ दिवे गेले म्हणून तो अंधारात चाचपडत

Tagged under: ,

३४.१ त्याच्या अप्रतिम पदलालित्याचं तोंड भरुन कौतुक केल्यावर त्याला रंगमंचावर बोलावलं तेव्हा सत्काराला उत्तर देताना तो म्हणाला”क्षमा करा, तुमच्यासमोर असं व्हीलचेअरवर बसून राहणं योग्य नाही पण नृत्य करताना होणाऱ्या वेदना येऊ देत नाही मी चेहऱ्यावर पण नृत्यानंतर मात्र माझ्या वेशभूषेबरोबर माझे जयपूर फूट पण काढावे लागतात मला … ३४.२ परवडत नाही म्हणून दोघांपैकी एकालाच खूप

Tagged under: ,

३३.१ तो धावता धावता तोंडाला फेस येऊन पडला. त्याने वर पाहिलं तर आजूबाजूच्या सगळ्यांच्याच तोंडाला फेस आला होता. त्याने त्यातल्याच एकाला विचारलं अरे आपण का इतके धावतोय ? तो म्हणाला मला माहीत नाही पण एक लक्षात आलंय की जितका फेस तोंडाला जास्त येतो तितके जास्त पैसे जमा होतात बँकेत माझ्या.. ३३.२ तो जादूगार रस्त्यावर खेळ

३२.१ त्याच्या मित्राने त्याला खूप रकमेचं कर्ज दिलं. त्याने मित्राला विचारलं “हमीपत्र कुठल्या वकीलाकडून करून घेऊया?” मित्र म्हणाला, “कागद नको. तू फक्त शब्द दे. तुझ्या संकारांचं हमीपत्र पुरेसं आहे माझ्यासाठी” ३२.२ विषण्ण मनाने तो देवळात गेला पण मन शांत झालं नाही त्याचं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो त्याच मनस्थितीत स्मशानात गेला. तिथे जळणाऱ्या एकाकी