आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्यावर खूप परिणाम होतो असा मानसशास्त्राचा एक सिद्धांत आहे. सर्व संत मंडळींनी म्हणूनच सत्संगतीचा महिमा गायला आहे. वातावरणाचा मनावर खूप परिणाम होतो आणि त्याच वातावरणातील लहरींशी मन एकरूप होण्याचा प्रयत्न करतं असं मानसशास्त्र मानतं. आधुनिक जगात सर्वच बाबतीत संगणकीकरण सुरु आहे. डिजिटल जग सर्वच व्यापून दशांगुळं उरलं आहे. ध्वनी डिजिटल, छायाचित्र डिजिटल,

बुद्धिबळ हा खूप गमतीशीर खेळ आहे. हालचालीला केवळ ६४ घरं. वेगवेगळ्या स्वभावाची म्हणजेच चालीची ३२ प्यादी. त्यात एक वजीर आणि एक राजा. ६४ घरं पण दोनच रंगांची. घर एक तर काळं तरी नाहीतर पांढरं तरी. बुद्धिबळ खेळताना पहिल्या चालीपासून सावध असायला लागत कारण एक चाल, एक निर्णय चुकीचा घेतला आणि समोरचा चाणाक्ष असला की जी

आमच्या घराजवळच एक शांत मंदिर आहे. “जागृत स्थान” अशी प्रसिद्धी झाली नसावी कदाचित म्हणून ते मंदिर अजून तरी गजबजलेलं नाही आणि म्हणूनच देव अजूनही त्या वास्तूत टिकून आहे अशी एक माझी श्रद्धा आहे. त्या शांत मंदिरात गेलं नं की गाभाऱ्यात गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. परिसरातल्या गडबड हालचाली आवाज बाहेरच रावखुळलेले असतात. गाभाऱ्यात बऱ्याच वेळा

कोणी जर कधी आपल्याला सांगितलं की कुणी आपल्याबरोबर २४ तास राहतं. त्याच्या इच्छेनुसार आपल्याला नाचवतं पण असं असूनही आपली त्याच्याशी फारशी ओळख नसते तर खरं वाटेल? अहंकाराचं तसंच नाही का? खूप ऐकत आलोय या अहंकाराबद्दल. प्रत्येक जागृत क्षणी आपला अहंकार एक तर सुखावत असतो किंवा दुखावत असतो. पण हा अहंकार म्हणजे नक्की आहे तरी काय?

जन्माला येऊन थोडं कळायला लागल्यावर प्रत्येक श्वास हा आपण जगापासून वेगळे आहोत ही जाणीव करून घेणे आणि मग जगात आपलं वेगळेपण प्रस्थापित करण्यात खर्च होतं. आपण जगावेगळ काहीतरी कराव, आपण चार चौघात उठून दिसावं, आपलं चार चौघात कौतुक व्हावं यासाठी आपल्या अजाणतेपणी आपले आईवडील आणि नंतर जाणते झाल्यावर आपण या इच्छेला खात पाणी देतो आणि

TOP