Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • alak
  • अलक (अति लघु कथा) – भाग १८ (Alak – Part 18)

अलक (अति लघु कथा) – भाग १८ (Alak – Part 18)

by Rajendra Vaishampayan / Wednesday, 20 September 2017 / Published in alak

१८.१

वास्तुसंग्रहालयातील त्या भग्न मुर्तीसमोर उभा राहून मी त्या मूर्तीच्या तुटलेल्या हाताकडे पाहून हळहळत होतो. एवढ्यात ती मूर्ती   जिवंत होऊन मला म्हणाली,” माझा हात तोडला तेव्हा परकीय आक्रमण तरी झालं होतं रे! स्वतंत्र देशात तुमची अवस्था माझ्यापेक्षा काही वेगळी आहे असं वाटतंय का तुला ?” माझी नजर जमिनीकडे वळली नकळत.

१८.१

समुद्रकिनाऱ्यावरून चालत होतो. वाळूवर पावलांचे ठसे उमटत होते. मी समुद्राला म्हटलं “दररोज भरतीत माझ्या पावलांचे ठसे वाळूवरून मिटवण्यासाठी का इतके कष्ट घेतोस?” सागर म्हणाला,” दररोजचा दिवस नाविन्याने जगा हे लोकांना शिकवण्यासाठी अख्खा सूर्य गिळतो मी, तुझे पावलांचे ठसे ही काय फार मोठी गोष्ट आहे मला?”

१८.३

आपल्या मार्गाने जाताना खूप वेळा ठेचकाळलं तिला, खूप वेळा दुभंगली ती खूप वेळां कपाळमोक्षही नशिबी आला तिच्या तरीही स्वत्व टिकवत अखंड चालत राहिली ती. पण उदधि भेटला आणि काय झालं कोणास ठाऊक, पण ती नदी स्वतःला विसर्जित करून समर्पित झाली त्याला.

१८.४

नदीच्या किनाऱ्याने चाललो होतो. पूर्वी नदीत निर्माल्याची फुलं दिसायची प्लास्टिकच्या पिशवीत इतस्ततः वाहणारी. हल्ली काचेच्या बाटल्या दिसायला लागल्यात गडद रंगाच्या. आनंदाची व्याख्या बदलत्ये हे लक्षात आलं माझ्या  पण नदीच्या प्राक्तनात त्या आनंदाचा कचराच येणार का ? हा प्रश्न मात्र मनाला भेडसावत राहिला.

१८.५

‘माझी आई’ या शब्दावर वर्गात निबंध लिहायला सांगितला शिक्षकांनी. त्याने ती संकल्पनाच अनुभवली नव्हती तर तो लिहीणार तरी काय होता? त्याच्या डोळ्यातले दोन थेंब पाटीवर पडले. त्या थेंबांच्या ओलाव्याने त्याने पाटी स्वच्छ पुसली आणि ती पाटी शिक्षकांच्या हाती देताना दोघेही निशब्द होते.
तोही आणि त्याची पाटीही.

  • Tweet

About Rajendra Vaishampayan

What you can read next

अलक (अति लघु कथा) – भाग ५० (Alak – Part 50)
अलक (अति लघु कथा) – भाग ७ (Alak – Part 7)
अलक (अति लघु कथा) – भाग ३९ (Alak – Part 39)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP